अहमदपूर तालुक्यात 'पोलिसांच्या वेशातील' भामट्यांचा सुळसुळाट; वयोवृद्धांनी विशेष काळजी घ्यावी- विनोद मेत्रेवार अहमदपूर शहर आणि तालुक्यात सध्या 'मी पोलीस आहे' असे सांगून नागरिकांना लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. विशेषतः माळेगाव यात्रेच्या निमित्ताने शहरात अशा भामट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या चोरट्यांनी अनेक नागरिकांना, विशेषत: महिला आणि पुरुषांना, 'मी पोलीस आहे' असे भासवून त्यांचे दागिने लुटण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे