समुद्रपूर: डोंगरगाव शिवारातील शेतात अनधिकृत पोल टाकून विज पुरवठा घेणाऱ्या तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल
समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारातील शेतात अनाधिकृत पोल टाकून विज पुरवठा घेणाऱ्या तिघांवर महावितरण कंपनीच्या वैशाली बारापात्रे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.आरोपींनी शेतामध्ये कोणत्याही परवानगी न घेता नविन पोल टाकून अनधिकृत विज कंपनीचे अंदाज पत्रक मंजूर न करुन घेता डिमांड न भरता परसपर तिन पोल उभे केले.१५० मिटर थ्री फेज विज वाहीनी घेऊन विज मिटर स्थलांतर करून विज पुरवठा सुरू केला.