समुद्रपूर: जोरविरा शिवारात नालीच्या गाळात फसलेल्या चितळाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून सोडले जंगलात
गिरड गावालगतच्या चोरवीरा शिवारात ३ जुलै रोजी २ वाजता रस्त्याच्या कडेच्या नालीतल्या गाळात फसलेल्या चितळाला शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले.गिरड ते पिपरा पांदन रस्त्यांच्या कडेला खोल नालीतल्या गाळात चितळ फसलेले आढळून आले. दरम्यान शेतकरी बंडू तेलरांध्ये यांनी वनविभागाला माहिती दिली. यावेळी सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन. नेहारे, वनरक्षक एस. ए. लांडगे, यांनी बाहेर काढून जंगलात सोडून दिले.