दारव्हा: वागद खुर्द शेत शिवारात वन्य प्राण्यांमुळे कपाशी पिकाचे नुकसान, वन विभागाला दिले निवेदन
दारव्हा तालुक्यातील वागद खुर्द शेत शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतशिवारातील कपाशी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्वरित वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शासनाने झालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन वागद खुर्द येथील शेतकरी लक्ष्मण राठोड यांनी आज दिनांक 26 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग दारव्हा यांना दिले आहे.