अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरात एका भागवत कथेच्या धार्मिक कार्यक्रमात विजेचा धक्का बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला
Ambejogai, Beed | Oct 27, 2025 दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या सात दिवसीय भागवत कथा ज्ञानयज्ञात दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवचनादरम्यान विजेचा धक्का बसून प्रशांत सुधाकर सोनवणे (वय 23) या युवकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्य ज्योती परिवार लातूर संस्थेच्या संवर्धन प्रकल्पांतर्गत अंबाजोगाईतील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान भागवत महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेत आशुतोष महाराज यांच्या शिष्या साध्वी अदिती भारती प्रवचन देत आहेत.