इंदापूर: 1967 पासून शरद पवारांनी इंदापूरचा विकास केला तुम्ही काय केलं अजित पवारांना सख्खे बंधू श्रीनिवास पवारांचा इंदापूरात सवाल
Indapur, Pune | Apr 15, 2024 1967 पासून मी शरद पवारांना पाहतोय त्यावेळी मी चार वर्षाचा होतो.आज जे टीका करतात त्यावेळी त्यांचा जन्म हि नव्हता. बारामती लोकसभा मतदारसंघासही इंदापूर तालुक्याचा विकास शरद पवार यांनी केला.तुम्ही तरुणांसाठी काय केलं ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सोमवारी रात्री इंदापूर शहरातील दर्गाह मज्जीत चौकात आयोजित शिरखुर्मा पार्टीत केला आहे.