पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या नागपूर -उमरेड महामार्गावरील कळमना शिवारात गुप्त महितीच्या आधारे कुही पोलीसांच्या पथकाने मोहफुल दारु विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध कूही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. रोशन अशोक खोब्रागडे वय 38 राहणार चांपा वस्ती असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कूही पोलीस करीत आहेत.