धारूर: आंबेवडगाव येथे चोरट्याने घर फोडले, पंधरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये लंपास
Dharur, Beed | Nov 18, 2025 आंबेवडगाव येथे रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून १५ तोळे सोने आणि ५० हजार रुपयांहून अधिक रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास केला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून धारूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंबेवडगाव येथील माणिक तुळशीराम घोळवे आणि मोकिंदा धर्मराज घोळवे यांच्या घरी ही चोरी करण्यात आली. पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.