संजीवनी अभियान कार्यक्रमाला देशपातळीवर मानांकन मिळवून देण्याचे काम आशाताईपासुन सर्व तंत्रज्ञ,परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगून जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संजीवनी अभियान गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे,अधिष्ठात डॉ.चक्रधर मुंगल, डिएचओ डॉ.कैलाश शेळके, डॉ पवार डॉ रुणवाल उपस्थित होते