धुळे: केळीला कवडीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघेना; बोरी-निमगुळमध्ये हतबल शेतकऱ्यांनी कष्टाचे पीक घातले जनावरांना
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे तालुक्यातील बोरी आणि निमगुळ परिसरातील केळी उत्पादक शेतकरी अतिवृष्टी आणि पडलेल्या बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. केळीला फक्त २०० ते ३०० रुपयांचा भाव मिळत असल्याने वसंतराव सूर्यवंशी, सुभाष पाटील, अभिमान पाटील, दीपक पाटील आणि सखाराम नाना यांच्यासारख्या शेतकऱ्यांना लाखोंचा माल जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. कापूस, कांदा, सोयाबीनलाही भाव नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी केली आहे.