नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या सुटताना दिसत नाही. राहुरी शहरानजीक आज दुपारी १२ वाजल्यापासून तब्बल दोन तास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवासी, वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. त्यातच अवजड वाहनांची गर्दी, नाताळाच्या सुट्ट्या असल्याने शिर्डी आणि शिंगणापूर येणाऱ्या भाविकांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे.