इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावर बसस्थानकासमोर मोठी दुर्घटना टळली. बस वळत असताना एक मोटारसायकलस्वार थेट बसच्या चाकाखाली गेला. मात्र उपस्थित नागरिकांच्या दक्षतेमुळे आणि चालकाच्या वेळीच ब्रेक दाबल्यामुळे मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.