डॉ. आंबेडकर वार्ड रामटेक येथील 103 वर्षीय गंगाबाई सावजी साखरे ही वृद्ध मागील 3 महिन्यांपासून फक्त दोन चम्मच पाण्यावर जीवन जगत होती. अशातच सोमवार दि. 12 जानेवारीला सायं. 5 वा.च्या दरम्यान तिची हालचाल अगदी थंड पडल्याने ती मृत झाल्याचे पारिवारातील अनुभवी जेष्ठांनी ठरविले व तिचा श्वास पूर्णपणे बंद झाल्याचे लक्षात आल्याने तिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी जमिनीवर ठेवण्यात आले. या दरम्यान सायं.7 वा च्या सुमारास उपस्थित एका नातेवाईकाला ती जिवंत असल्याचे लक्षात आले.