लातूर: गंजगोलाई भागातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी मनपा पोलीस प्रशासनाची पाहणी; पार्किंग आणि एकेरी वाहतूक रस्ता यावर भर
Latur, Latur | Nov 29, 2025 लातूर -कोंडी दूर करण्यासाठी लातूर मनपा उपायुक्त फड पोलीस प्रशासन यांनी आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान परिसराची थेट पाहणी केली. या वेळी पार्किंग व्यवस्था सुधारण्यासोबत ऑटोरिक्षा थांबा व एकेरी वाहतूक रस्ते करण्याच्या योजना तपासण्यात आल्या. पाहणीमध्ये वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बाबूराव गित्ते, शहर अभियंता उषा काकडे, क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी, रवि कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक, शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव आणि अतिक्रमण प्रमुख संतोष रणदिवे उपस्थित होते..