मकर संक्रांत आणि दुर्गाबाई डोह यात्रेच्या शुभ मुहूर्तावर कुंभली-धर्मपुरी येथे लावणीचा एक अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि 'बैलगाडा फेम' नृत्यांगना जुही शेरकर हिचा विशेष कार्यक्रम १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कुंभली येथील एन.डी. विद्यालयाच्या भव्य पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन 'युवा मित्र मंडळा'च्या वतीने करण्यात आले आहे.