भंडारा: कान्हळगाव येथे विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू; भंडारा पोलिसात घटनेची नोंद
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील २८ वर्षीय विवाहिता मंगेश्वरी पिरुदास ईश्वरकर हिचा धान पिकावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २६/१०/२०२५ रोजी मंगेश्वरीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. तिच्या पतीने तिला तात्काळ डॉ. पडोळे हॉस्पीटल, भंडारा येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिच्यावर डॉ. आकरे हॉस्पीटल, भंडारा येथील आय.सी.यू. (ICU) वॉर्डमध्ये उपचार सुरू असताना, अखेर दि. १७/११/२०२५ रोजी अंदाजे ०२:१५.