मोताळा: मोताळा तहसीलदारपदी सरिता पाटील रुजू
मोताळा येथील तहसिलदार हेमंत पाटील यांना बुलढाणा येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले होते. तेंव्हापासून येथील तहसीलदारपद रिक्त होते. दरम्यान, रिक्त असलेल्या या पदावर सरिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून सरीता पाटील यांनी मोताळा तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला असल्याची माहिती २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्राप्त झाली आहे.