हिंगणा: वानाडोंगरी ओम शांती गारमेंट्स व अभय जनरल स्टोअर्स जवळ अज्ञात वाहनाचा धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू
Hingna, Nagpur | Jan 9, 2026 मृतक मनिष मुरलीधर केवटे, वय ३८ वर्षे, रा. सोनबा नगर, दुचाकी घेवून, महाजनवाडी, वानाडोंगरी येथे जात असता, पोलीस ठाणे एमआयडीसी. हद्दीत ओमशांती गारमेन्ट व अभय जनरल स्टोअर्स जवळ कोणत्यातरी अज्ञात चार चाकी वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन मनीष यास धडक देवुन पळुन गेला. मनीषला उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला.