शहरातील ढोकेनगर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्यावेळी टाटा कंपनीचा टेम्पो चोरुन नेला. प्रजेश बाळासाहेब नेहे (३५) यांच्याकडे टाटा १९९६ टेम्पो क्र. एम. एच. १५/ जे. क्यू. ५२५२ असून त्यांनी आपला टेम्पो घराजवळील मोकळ्या जागेत उभा केला होता. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी संधी साधत तेथून टेम्पो पळवून नेला.