कन्नड येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद तसेच सर्व सहकारी नगरसेवकांचा पुण्याई येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कन्नडचे माजी आमदार नामदेवराव पवार उपस्थित होते. कन्नड नगरपरिषद निवडणुकीतील विजयासाठी पवार यांनी घेतलेली अथक मेहनत विशेष उल्लेखनीय ठरली.त्यांच्या योगदानाची दखल घेत पवार दांपत्याचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.