दारव्हा: शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मुख्याधिकारी नगरपरिषद यांना मागणी
गेल्या काही दिवसांपासून दारव्हा शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. काहींना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने ते जखमी झालेले आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी दिग्रस विधानसभा प्रभारी यांनी दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना बुधवार दिनांक 26 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता दरम्यान दिले आहे.