अंबाजोगाई: माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अंबाजोगाई उमेदवारी अर्ज दाखल केला
Ambejogai, Beed | Nov 17, 2025 अंबाजोगाई शहरात आज माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळपासूनच मोदी यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात व घोषणाबाजी करत भव्य रॅली काढली. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, महिला बांधव, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग उत्साहाने सहभागी झाला. मोठा समर्थक वर्ग, शिस्तबद्ध मिरवणूक आणि झेंड्यांच्या फडकण्यातून मोदी यांची अंबाजोगाईतील संघटना आणि जनाधार स्पष्टपण