गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने पावडदौना शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की महसूल विभागाचे पथक गस्तीवर असतांना पावडदौना शिवारात वाहनांची तपासणी केली असता विना क्रमांकाच्या टिप्पर मध्ये रेती आढळून आली. त्यावरून कागदपत्रे तपासणी केली असता अवैधरित्या रेती वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन सदर कारवाई महसूल विभागाने केली.