येवला तालुक्यातील आडगाव चौथवा येथे शिवाजी मुरलीधर खोकले यांनी 20 ते 30 ट्रॉली चारा कुट्टी ही साठवून ठेवली ती मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या साठवलेल्या चारा कुट्टीला आग लावली असता संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या ठिकाणी जनावरे देखील बांधलेली होती. तरी संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.