गोंदिया: कुडव्यात पानटपरीवर अवैध दारू विक्री; २,७३५ रुपयांचा साठा जप्त,रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कुडवा येथील घटना
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कुडवा येथील वाॅर्ड क्रमांक-३ मध्ये पानटपरीवर धाड टाकून पोलिसांनी देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.२१) सकाळी ९ वाजता करण्यात आली.ग्राम कुडवा येथील वाॅर्ड क्रमांक-३ मध्ये असलेल्या पानटपरीतून आरोपी भोजराज झगड्डू सावनकर (५८, रा. वाॅर्ड क्र. ३, कुडवा) हा अवैधरीत्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने पानटपरीची झड