वर्ष २०२५ सरता सरता आर्णी नगरपरिषद च्या सार्वत्रिक निवडणुक झाली मात्र नव्या कार्यकारणी ला पदभार घेण्यासाठी वेळ असतांना आर्णी नगरपरिषद ने रहवासी नागरिकांना नव्या अवाजवी कराचा शॉक दिला त्यामुळे आर्णीत नागरिक व व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अचानक मोठ्या प्रमाणावर करात वाढ उपझाली कशी हा सामान्य प्रश्न नागरिकांना पडला उप करत देखील विचित्र रूपाने मागणी केली. कर निर्धारित करण्यास नेमलेल्या एजन्सी ने इतर नगर परिषद पेक्षा जास्तीचे दर आकारले असा आरोप कवी विजय ढाले यांनी केला.