साकोली तालुक्यातील भिसनटोला येथील जयदेव सोमाजी भलावी हे आपल्या शेळ्या घेऊन गुरुवार दि 25 डिसेंबरला पहाटे आठ ते नऊच्या दरम्यान ऊसवाडी मध्ये शेळ्या चारत असताना दोन बिबट्यांनी त्यांच्या एका शेळीवर हल्ला करून ठार केले त्यामुळे त्यांचे 15 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे दिवसाढवळ्या गावात बिबट्याचा शिरकाव होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे