हिंगणघाट: नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ नयनाताई उमेश तुळसकर यांनी स्विकारला पदभार:नव्यापर्वाच्या सुरवातीचे आश्वासन
हिंगणघाट नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित पदग्रहण सोहळ्यात अधिकृतपणे नगराध्यक्ष पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी सर्वाधिक मतांनी निवडून दिल्याबद्दल शहरातील नागरिकांचे मनापासून आभार मानले. हिंगणघाटच्या विकासासाठी मिळालेली ही संधी पूर्ण ताकदीने साध्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.नगरपालिकेसाठी दीर्घकालीन विकास आराखडा राबविण्यावर भर देण्यात येणार असून शहरात रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचे मानस व्यक्त केला