वर्धा शहरालगत असलेल्या अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांच्या मुळावर घाला घालण्यासाठी सेवाग्राम पोलिसांनी आज एक धडक 'वॉश आऊट' मोहीम फत्ते केली आहे. मांडवगड पारधी बेडा परिसरात पहाटेपासूनच पोलिसांनी धाडसत्र राबवत तब्बल ५ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. असे आज 9 जानेवारी रोजी रात्री 10वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे