*अमरावती : दस्तुरनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व स्वच्छता मोहिम; ४ हजारांचा दंड वसूल* *अमरावती प्रतिनिधी,* अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे (झोन क्र. ३) यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १० डिसेंबर २०२५ रोजी झोन क्र. ३ अंतर्गत दस्तुरनगर चौक परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली.