औंढा नागनाथ येथील बस स्थानकाजवळ पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्ती दरम्यान पोउपनि शेख खुदुस,दत्ता कानगुले,माधव सूर्यवंशी यांनी दिनांक १२ नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री पावणे बारा वाजता अवैध वाळूची वाहतूक करणारे टिप्पर वाहन क्रमांक एमएच ३८ एक्स ४०८३ पकडून दोन ब्रास वाळू सह टिप्पर असा १५ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करून पोउपनि शेख खुदुस यांच्या फिर्यादीवरू दोघांवर दिनांक १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी पहाटे तीन वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे