जालना: आज दिनांक १७/१२/२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्ष-किरण तपासणी, बेडका नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मा. डॉ. जयश्री भुसारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कॅम्प संपन्न झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक वाघमारे, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या.