कन्नड पंचायत समितीतील कारभारावर गंभीर प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे मर्जीतील कारभार आणि संभाव्य भ्रष्टाचाराचे थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते युवराज बोरसे यांनी केले आहे मनरेगा म्हणजेच एमआरजीएस अंतर्गत झालेल्या कामांबाबत माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती जाणीवपूर्वक लपवली जात असल्याचा आरोप बोरसे यांनी केलाय.