दिग्रस: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचे मतदान; लग्न पोशाखात नवरदेव अनुराग दिग्रसच्या मतदान केंद्र क्र. ६, खोली क्र. १ वर दाखल
लोकशाहीची जाणीव आणि जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण दिग्रस येथील नवरदेव अनुराग शंकरराव पवार यांनी घालून दिले. 2 डिसेंबर रोजी उमरखेड येथील प्रिया शामलाल बिर्ला यांच्याशी त्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याच दिवशी नगर परिषद दिग्रसचे मतदान असल्याने अनुराग यांनी लग्नापूर्वीच मतदान करण्याचा निर्णय घेतला. लग्नाचे पारंपरिक पोशाख परिधान करून २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अनुराग थेट प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्र क्रमांक 1 येथे पोहोचले.