तलासरी: उधवा आश्रमशाळेत चोरी, शासकीय टॅब गेले चोरीला , तलासरी पोलिसांनी केली आरोपीला अटक
आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा उधवा येथील मुलांच्या देण्यात आलेल्या टॅब मुख्यध्यापकाच्या हलगर्जीपणा मुळे चोरीला गेले होते. यावर तलासरी पोलीस ठाण्यामध्ये 13 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आले आहे. प्रेम दळवी असे आरोपीचे नाव आहे.