दारव्हा: तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे भरा - सामाजिक कार्यकर्ते बिमोद मुधाने यांची मागणी
दारव्हा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या सलग सेवानिवृत्तीमुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे तहसीलदार निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसतात. त्यामुळे रिक्त असलेले नायब तहसीलदाराची पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी मुधाने यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.