ब्राह्मणी येथे एका वृद्ध व्यक्तीस अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी गोविंदराव मोतीराम चांदेकर (वय ६५, रा. ब्राह्मणी) यांच्या फिर्यादीवरून गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता समीर उमेश आत्राम रा. ब्राम्हणी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.