समुद्रपूर: शहरात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली यांमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी 9 जुन रोजी रात्री 8 वाजता समुद्रपुर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बॉंड बाजासह एकमेकांना गुलाल लावून पेढे भरवून फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंद उत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.