भीम संग्राम सेना रामटेक शाखेच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणदिनी शुक्रवार दि. ६ डिसेंबरला सायं.8 वा. पासून ते रात्री 11.30 वा. पर्यंत चाललेल्या 'विश्वाचा राजा भीमराव माझा' या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्या जीवनकार्याच्या स्मृती उजळत त्यांचे अतुलनीय बेजोड कार्य गीतांच्या माध्यमातून सादर करुन प्रबोधन करण्यात आले. सुपर मार्केट रामटेकच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार विकास राजा यांनी भीमगीते, कव्वाली, गझल सादर केली