कन्नड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी–राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या २५ पैकी १५ नगरसेवकांना जनतेने विजयी करून ऐतिहासिक कौल दिला.या यशाबद्दल जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी मतदार, कार्यकर्ते व समर्थकांचे मनापासून आभार मानले.पंधरा वर्षांनंतर कन्नड नगरपरिषदेत भाजपचे नगरसेवक विजयी झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.युतीत भाजपने लढवलेल्या पाच जागांपैकी तीन जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.विजयी नगरसेवक सोनाली सुनील पवार, कचरू आव्हाले व सोनाली प्रेमसिंग बेनाडे.