तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५-२६ या वर्षाचा भव्य शुभारंभ ता. २ जानेवारी शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंत हायस्कूल, सेलू येथे झाला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून सहायक गटविकास अधिकारी रामचंद्र चोपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अशोकराव मुडे, गटशिक्षणाधिकारी संगीता महाकाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी अर्चना पोरेड्डीवर, शालिनी हाते, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन फासगे उपस्थित होते.