राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा शिवारात आज राञी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी रील स्टार ज्योती कोहकडे यांच्या शेतामध्ये बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच घबराट पसरली आहे.या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. आज प्रत्यक्ष बिबट्या दिसताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.