समुद्रपूर: गिरड परीसरात गांजा वाहतूकी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई:२५ लाख ५७ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार १ जुलैला १२ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गिरड परीसरात सापडा रचून ओडीसा वरुन कार मध्ये १०२ कीलो गांजा वाहतूक करणाऱ्यावर विरोधात मोठी कारवाई करीत २५ लाख ५७ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सुरज राजकुमार वासेकर व 28 वर्षे रा.संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट यास अटक केली तरआशिष हाडके राहणार कडाजना ,अस्मित भगत राहणार सेवाग्राम हे फसार झाल्याची माहिती आज २ जुलै रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.