चाळीसगाव: धुळे-चाळीसगाव महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे असलेल्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या मोटरसायकलने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता, मात्र उपचार मिळण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण मालेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.