स्मार्ट अंगणवाडी किट वाटप करण्यापेक्षा अंगणवाडीला इमारत द्या, बेलगाव येथील ग्रामस्थांची मागणी
Beed, Beed | Nov 19, 2025 बेलगाववस्तीमध्ये अंगणवाडीला राज्य शासनाकडून “स्मार्ट अंगणवाडी कीट” मिळणार असले, तरी मुलांच्या सुरक्षिततेचा मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गेली ७ ते ८ वर्षे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या अंगणवाडीत १८ बालकांचा रोज धोका वाढतो आहे. पावसाळ्यात गळती, वादळ, वारा आणि विंचू-किड्यांचा धोका कायम असल्याने पालकांनी सुरक्षित इमारतीची तातडीची मागणी केली आहे. अंगणवाडी सेविका दीपाली फरतारे सांगतात की ग्रामस्थांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे.