हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार. समिरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद, वर्ध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक उपविभागीय कार्यालय, हिंगणघाट येथे पार पडली.या बैठकीत हिंगणघाट तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सखोल व गावनिहाय आढावा घेण्यात आला. येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याची अडीच पडू नये असे मत आमदार कुणावार यांनी व्यक्त केले.