अंबरनाथ: बदलापूर मध्ये निवडणूक आयोगाने पैसे खल्ल्याचा उमेदवारांकडून आरोप
बदलापूर येथे निवडणूक आयोगाने पैसे खाल्ले असा आरोप काही उमेदवारांकडून केला जात आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक स्थगित झाली असून बदलापूर नगरपरिषदेच्या काही प्रभागांची निवडणूक देखील स्थगित झाली आहे. आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास निवडणूक आयोगाकडून माहिती देण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी काही उमेदवारांकडून पैसे खाल्ल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी मोठा गदारोळ देखील झालेला पाहायला मिळाला.