भंडारा: आमदार भोंडेकरांनी घेतला शहरातील १६ व १७ प्रभागांचा आढावा; नागरिकांच्या समस्या जाणून, तात्काळ निवारणाची ग्वाही!
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक १६ आणि १७ ला भेट देऊन तेथील स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान, त्यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, परिसरातील समस्या आणि आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांनी अत्यंत विश्वासाने मांडलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्द्याची आमदार भोंडेकर यांनी गांभीर्याने नोंद घेतली. नागरिकांच्या मूलभूत गरजा व समस्यांची दखल घेऊन, त्यावर....