आमगाव शहरातील बजरंग चौक येथे प्रवीण गजानन पारधी (४०, रा. बजरंग चौक) हा युवक दारूच्या नशेत असताना स्लॅपवरून तोल जाऊन खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. आतीश गजानन पारधी (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमगाव पोलिसांंनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार कुंभरे करीत आहेत.