महाराष्ट्र पोलीस दलाचा 'वर्धापन दिन' म्हणजेच 'रेझिंग डे' सप्ताह सध्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने पोलीस दलाची कार्यपद्धती, त्यांची शस्त्रे आणि विविध विभागांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एका भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. असे आज सहा जानेवारी रोजी रात्री 9वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे ,